29/10/2016



मी जितेंद्र विजय जाधव (प्रा.शिक्षक) प्रथमतः आपले शेवाळी गावाच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आपण समाजाचे काही देणे लागत असतो आपण समाजात राहतो , वावरतो , म्हणून प्रत्येक जण आपापल्या पध्द्तीने काही ना काही समाजासाठी काही तरी करतो म्हणून मला हि वाटले कि आपण हि काही तरी वेगळे करावे मी हि या मध्ये सहकार्य करावे असे वाटत होते परंतु काय करावे कि आपणही या समाजाला सहकार्य करण्या मध्ये खारीचा वाटा उचलू शकू . बऱ्याच प्रयत्ना नंतर मला एक युक्ती सुचली कि आपण गावातील सर्व लोंकाना एकत्र आणू शकतो , कारण बहुतेक तरुणांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत , मोबाईल च्या माध्यमातून आपण त्यांना एकत्र आणू शकतो म्हणून मी एक ग्रुप बनविला " शेवाळी लयभारी" या ग्रुप मधून मी आपल्या गावातील विदेशात असणारे , उच्च पदावर असणारे , तसेच   इतर क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला , परंतु तो प्रयत्न काही खास जमला  नाही म्हणून वेगळा मार्ग काढावा असे वाटले.
        म्हणून त्याच माध्यमातून म्हणजे मोबाईल द्वारेच काहीतरी वेगळे करावे असे वाटले व मी माझ्या क्षेत्रात जशी सर्व शालेय माहिती एका वेबसाईड वर बनवली आहे तसेच आपण हि ते आपल्या गावासाठी करू शकतो.  व मी एक ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे  त्या ब्लॉग चे नाव आहे   "" शेवाळी""

   या ब्लॉग साठी गावातील अनेकांनी मला मदत केली त्या मध्ये , ब्लॉग साठी लागणारे फोटो मला चंद्रकांत संजय जाधव , फोटो वरील डिजाईन साठी माझे मित्र श्री. मनोज पाटील ( प्रा.शिक्षक कल्याण) ,  गावाच्या इतिहासासाठी श्री. किरण नांद्रे तसेच इतर माहिती साठी श्री. जितेंद्र विलास साळुंके या लोकांनी मला ब्लॉग तयार करण्यासाठी मदत केली त्यांचे मी ऋणी राहीन.

      याआपणास काही माहिती द्यावयाची असल्यास काही सूचना असल्यास सांगाव्यात मी आपला बदल स्वागतहर्ता स्विकारेन


19/10/2016

Whats app मध्ये GIF फाईल बनवणे




नमस्कार मित्रांनो
Whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी?
काही मोजक्या स्टेप्स आहेत.

१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.

२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या.

३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल.
४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल.

५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽 चे चित्र दिसेल.
त्यावर क्लिक करा.

६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.

७) अहो पाहता काय? आपली GIF फाईल तयार आहे. पुढे पाठवून द्या.

अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता.

09/10/2016

गुरुवर्य : विविध वर्तमान पत्रे

गुरुवर्य : विविध वर्तमान पत्रे: विविध वर्तमान पत्रे    महाराष्ट्रातील विविध वर्तमान पत्रे वाचण्यासाठी वर्तमान  पत्राच्या  नावावर click  करा                          ...